पन्नाशीपासून तरुण राहण्यासाठी करा ‘ही’ काम

टीम महाराष्ट्र देशा : तरुण राहण्यासाठी दिवसभरामध्ये शरीराला हवे एवढे पर्याप्त पाणी प्यावे. परंतु जेवण करण्यापूर्वी अर्धा तास पाणी घ्यावे. जेवण करत असताना थोडे पाणी पिऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर एक किंवा अर्ध्या तासाने पाणी पिणे फायदेशीर राहते.

Loading...

तसेच सकाळी झोपेतून लवकर उठावे. स्वप्नदोष समस्येपासून दूर राहण्यासाठी सकाळी लवकर झोपेतून उठावे. कारण सामान्यतः स्वप्नदोष ब्रह्म मुहुर्तामध्येच होतो. तारुण्याचे रक्षण करण्यासाठी यावेळी झोपेतून उठण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरु आहे.

गरम-गरम चहा, दुध, कॉफी पिणे दातांसाठी हानिकारक आहे. याचप्रकारे जास्त थंड पेयसुद्धा दातांना इजा पोहचवू शकतात. प्रत्येक खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर दरवेळी दात स्वच्छ धुवून घ्यावेत.

खूप थकवा आल्यानंतर लगेच जेवण करू नये. तसेच खूप परिश्रम केल्यानंतरही लगेच जेवण करू नये. यामुळे जेवण योग्य पद्धतीने पचत नाही आणि यामुळे पोटाचे आजार निर्माण होऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या Loading…


Loading…

Loading...