fbpx

जाणून घ्या सध्या देशात कोणत्या पक्षाचे किती खासदार

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणारआहे. मुख्य आयुक्त सुनील अरोडा यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करतील अशी शक्यता आहे .

भाजपप्रणीत एनडीए आणि कॉंग्रेस आणि भाजपविरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महागटबंधन यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. समाजवादी पार्टी आणि बसपाने वेगळी चूल मांडल्याने या निवडणुकीत रंगत आणली आहे. या धर्तीवर लोकसभेतील एकूण पक्षीय बलाबल, कुणाकडे किती खासदार होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. कारण आगामी लोकसभा निवडणुकांनंतर हे पक्षीय बलाबल बदललेले  असेल.

देशभरातील पक्षानुसार जागा
भाजप – 267
काँग्रेस – 44
अण्णाद्रमुक – 37
तृणमूल काँग्रेस – 34
बिजू जनता दल – 18
शिवसेना – 18
तेलुगू देसम पक्ष – 15
तेलंगणा राष्ट्रीय समिती – 10
माकप – 9
समाजवादी पक्ष – 7
लोक जनशक्ती पक्ष – 6
राष्ट्रवादी – 6
राष्ट्रीय जनता दल – 4
आप – 4
वायएसआर काँग्रेस – 4
शिरोमणी अकाली दल – 4
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट – 3
अपक्ष – 3
राष्ट्रीय लोक समता पक्ष – 3
अपना दल – 2
इंडियन नॅशनल लोक दल – 2
इंडियन युनियन मुस्लिम लीग – 2
जनता दल (सेक्युलर) – 2
जनता दल (युनायटेड) – 2
झारखंड मुक्ती मोर्चा – 2
जम्मू काश्मिर पीडीपी – 1
एनडीपीपी – 1
पट्टाई मक्कल काट्ची – 1
राष्ट्रीय लोक दल – 1
रेवोल्युशनरी सोशलिस्ट पार्टी – 1
सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट – 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1
एमआयएम – 1
एनआर काँग्रेस – 1
भाकप – 1
जम्मू काश्मिर नॅशनल कॉन्फरन्स – 1
नामांकनप्राप्त अँग्लो इंडियन (भाजप) – 2
रिक्त – 24