मेहबूबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री; जम्मूची हिंदूबहूल ओळख पुसण्याचा प्रयत्न

mahebuba mufati

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कारातील मुख्य आरोपींचा खटला चालवणाऱ्या वकिलांनी आक्षेपार्ह वक्तव्य करीत मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना जिहादी मुख्यमंत्री संबोधले आहे. “जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री आहेत. आपल्या इस्लामी अजेंड्याच्या माध्यमातून हिंदूबहूल जम्मूमध्ये लोकसंख्येत बदल घडविण्याचा त्यांचा मानस आहे”, असं विधान त्यांनी केले आहे.

काय म्हणाले वकील अंकुश शर्मा

मेहबूबा मुफ्ती एक जिहादी मुख्यमंत्री आहेत. त्या गोहत्येसाठी कत्तलखाने आणि गोवंशाच्या तस्करीला कायदेशीर संरक्षण देत आहेत. जम्मू हिंदूबहूल भाग आहे. तेथे मुस्लिमांना जमिनी देऊन तेथे राहायला दिलं जातं. जम्मूची हिंदूबहूल ओळख पुसली जावी असा त्यामागील उद्देश आहे, या प्रकरणाबाबत हिंदू महासभेसहित अन्य संघटनांच्या नेत्यांसोबत बोलणं सुरू असून हिंदू एकता मंच स्थापन करुन ते आरोपीच्या समर्थनार्थ सीबीआयच्या चौकशीची मागणी करणार आहे.