औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांचे नाव चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते नेहमीच अडचणीत येत असतात. असे असतांनाच मेहबूब यांनी आपल्या सोशल मीडिया साईडवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते मालेगाव मधील वेगवेगळ्या ठिकाणी फिरत खाण्याचा आणि फिरण्याचा आस्वाद घेत आहे. मात्र, त्यांच्या या हौशीमध्ये त्यांनी प्रशासनाच्या नियमांना ठेंगा दाखवल्याचे देखील लक्षात येत आहे.
सोमवारी मध्यरात्री मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. ज्याला त्यांनी ‘मालेगाव मधील जावेद मिलन चा चहा , यादगार चे पान , पेहलनाव च दुध आणी नंतर सहकार्या सोबत बाईक वर राईट मस्तच’ असे कॅप्शन दिले आहे. पण या व्हिडीओमध्ये मेहबूब यांनी एकही नियमाचे पालन न केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सध्या सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावापासून बचावाकरीता प्रशासनाकडून मास्क चा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मात्र, मेहबूब यांनी इतक्या ठिकाणी फिरत असून सुद्धा त्यांनी मास्क चा वापर केलेला नाही. तसेच व्हिडिओतील काही ठिकाणी ते सहकाऱ्यांसोबत चर्चा करतांना दिसत आहे. तिथे सुद्धा त्यांनी मास्कचा वापर केलेला नाही. तसेच सोशल डिस्टंसिंग नावाचा प्रकारही व्हिडिओमध्ये दिसत नाही. फक्त इतकेच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांसोबत जोरदार वेगात गाडीवर फिरतांना त्यांनी हेल्मेटचा सुद्धा वापर केलेला नाही.
ठाकरे सरकारच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा
एकीकडे सर्वांना नियम पाळणे बंधनकारक असतांना मेहबूब शेख यांनी सर्व नियमांना फटकारून लावले आहे. फक्त एव्हढेच न करता मोठ्या हिंमतीने त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया साईडवर देखील शेअर केला आहे. त्यामुळे सरकार संबंधी त्यांच्यात भीती नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मेहबूब यांनी तोतडेल्या नियमांवर ठाकरे सरकार काय कारवाई करेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान,औरंगाबादमधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलिस चौकशीही झाली होती. या सगळ्या प्रकरणांवरुन भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील आवाज उठवला आहे. तसेच मेहबूब शेख यांना अटक व्हावी, अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी केले होते.
त्यानंतर मेहबूब यांनी चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याला प्रतिउत्तर देत ‘महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केले म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा. पण मी बोलत राहणार ‘असे ट्विट चित्र यांनी केले आहे. हे प्रकरण अजूनही संपुष्टात आलेले नसतांनाच मेहबूब शेख पुन्हा एकदा नवीन वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- लाज वाटली पाहिजे! समाजवादीच्या खासदाराला राष्ट्रगीतच येईना, पहा ‘हा’ व्हिडिओ
- मनपाचा ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मानस
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा