‘भाजपाकडे लाचखोर नवऱ्याची बायको, हे चित्र लोकांना विचित्र वाटते!’, मेहबूब शेख यांचा हल्लाबोल सुरूच

‘भाजपाकडे लाचखोर नवऱ्याची बायको, हे चित्र लोकांना विचित्र वाटते!’, मेहबूब शेख यांचा हल्लाबोल सुरूच

mehboob shekh

मुंबई: भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यातील वाद वाढतच आहेत. आता मेहबूब शेख यांनी पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट करत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

‘महीला अत्याचाराच्या घटना ह्या दुर्दैवी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे. पण आज दुर्दैवाने विरोधी पक्ष भाजपाकडे अत्याचाराच्या घटनांचे चित्र मांडण्यासाठी ‘लाचखोर नवऱ्याची बायको’ आहे. त्या मुळे हे चित्र लोकांना विचित्र वाटते, लोक गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे भाजपाने विजयाताई राहटकर, उमाताई खापरे यांच्या सारख्या महीला नेत्यांना घटनांच्या बाबतीत बोलायला लावले पाहिजे. कारण त्यांच्या बोलण्याला नैतीक वजन निश्चित राहील. नाहीतर लोक म्हणतातच की…!’ अशी खोचक पोस्ट करत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान या अगोदरदेखील त्यांनी ‘चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो’ अशी खोचक टीका त्यांनी केली होती. तर यावर चित्रा वाघ यांनी ‘मी वाघ आहे. मी काय आहे, काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा’ असे प्रतिउत्तर दिले होते. त्यावरच मेहबूब शेख यांनी ‘माझा मुलगा पण असल्या खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळत असतो.’ अशी खोचक टीका केली होती. त्यामुळे मेहबूब सतत चित्रा वाघ यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे आता हा वाद अजूनच वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या