मेहबूब शेख प्रकरणाला नवे वळण; कथित पीडितेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

मेहबूब शेख प्रकरणातील पीडितेची चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

मुंबई : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांच्यावर एका पीडितेने अत्याचाराचे आरोप केले होते. या प्रकरणात आता पीडितेने नवा खुलासा केला आहे. या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील कथित पीडितेने उलट भाजप नेत्या चित्रा वाघ आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरच आरोप केला आहे.

भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल केल्याच पीडित तरुणीने आरोप केला आहे. चित्रा वाघ आणि सुरेश धस यांनी आपल्याला शेख यांच्याविरोधात तक्रार द्यायला भाग पाडले, असा गुन्हा तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात दखल केला आहे. ज्यात एफआयरमध्ये सुरेश धस आणि  चित्रा वाघ यांची नावे आहेत.

मेहबुब शेख यांच्यावर काय आरोप होते?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याविरुद्ध डिसेंबर २०२०मध्ये औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायजीपुरा भागात राहणाऱ्या २९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख यांनी कारमध्ये आपल्यावर अत्याचार केला असा आरोप या तरुणीने केला होता. आपण प्रतिकार केला. मात्र, तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. मात्र आता या तरुणीने घुमजाव करत चित्रा वाघ आणि धस यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

>>> TOP CATEGORIES - राजकारण क्रीडा बातम्याकृषी बातम्याआरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्यानोकरी बातम्यामुंबई बातम्यापुणे बातम्याऔरंगाबाद बातम्यानाशिक बातम्यानागपूर बातम्याव्हिडीओ बातम्याTrending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<