Share

Mehboob Shaikh | “शंभुराज देसाईंचा विजय शिवतारे होणार”, देसाईंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन मेहबूब शेख यांनी घेतला समाचार

Mehboob Shaikh | मुंबई : सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. निवडणुकांचं वारं राज्यात घुमू लागलं असल्यामुळे सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर सतत टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शिंदे-भाजप (Shinde-BJP Government) सरकारवर टीका केली. त्याच्या वक्तव्याला राज्याचे उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिलं होता. यावर आता राष्ट्रवादी पक्षाचे मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी देसाईंचा खूब समाचार घेतला आहे.

यादरम्यान, साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून पुढच्या वेळी शंभुराज देसाई आमदार होणार नाहीत. त्यामुळे शंभुराज यांचा नाईलाज झाला आहे. मी किती प्रामाणिक आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटवून देण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही. पण पाटणची परिस्थिती शंभुराज देसाईंना पुढच्या विधानसभेत कळेल. शंभुराज देसाईंचा देखील विजय शिवतारे होणार, असं मेहबूब शेख म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आलं की लोकशाही टिकते. त्यांनी सत्तेतून पायउतार झालं की, लोकशाहीला धोका निर्माण होतो. मात्र, लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन झालं. लोकशाहीतूनच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

तसेच, बहुमताचा आदर केला पाहिजे, त्यालाच महत्व आहे. रामराजेंचा पक्ष आता सत्तेत नाही, ही त्यांची खंत आहे. राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत. पण, त्यांना अडीच नाहीतर पुढील दहा-पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत राहावं लागणार असल्याचं म्हणत शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीवर चांगलाच हल्ला केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Mehboob Shaikh | मुंबई : सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. निवडणुकांचं वारं राज्यात घुमू लागलं असल्यामुळे सत्ताधारी पक्षनेते आणि …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now