fbpx

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची विरोधकांसोबत सांगितिक जुगलबंदी

राजकारणात मुख्यमंत्री आणि त्यांच्या विरोधकांनी एकमेकांवर भले कितीही चिखलफेक केली असेल पण जेव्हा गोष्ट एकत्र मजा मस्ती करण्याची येते तेव्हा या दोघांनी राजकारण बाजूला ठेवून व्यासपीठावर अशी काही धमाल उडवून दिली.

मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा आणि त्यांचे विरोधक डॉ. डोनकुपर रॉय, पॉल लिंगदोह यांची व्यासपीठावर संगितिक जुगलबंदी रंगली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांनी गायला सुरूवात केली अन् पॉल यांनी देखील त्यांना चांगलीच साथ दिली. संगमा यांच्या मुलीच्या लग्नातील हा व्हिडिओ असल्याचे समजते. संगमा स्वत: एक उत्तम गायक आहेत. कॉलेजमध्ये असताना कॉलेज बँडमध्ये ते सक्रिय होते. तर लिंगदोह हे उत्तम कवी देखील आहेत. त्यामुळे कवी आणि गायकामध्ये रंगलेली जुगबंदी पाहायला मिळणे अनेकांसाठी पर्वणीच ठरली. या व्हिडिओला सोशल मीडियावर भरभरून प्रसिद्धी मिळत आहे.