मेगा भरतीची प्रक्रिया सुरू लवकरच होईल,मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

धुळे :मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असल्यानं मेगा भरतीला स्थगिती देण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली होती. या याचिकेवर 23 जानेवारीला सुनावणी होणार आहे.या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले असताना आता राज्यात सरकारच्या मेगा भरतीबाबत आता कोणतीही बंदी नसून लवकरच आम्ही मेगा भरती बाबत जाहिरात काढणार आहोत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मेगा भरतीबाबत न्यायालयीन मार्ग मोकळा झाला असून लवकरच भरती बाबतची कारवाई सुरू होईल. 2 टप्प्यात होणाऱ्या या भरतीमध्ये आधी 32 हजार पदं भरली जाणार आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहे.

You might also like
Comments
Loading...