fbpx

मुंबई महापालिकेत १३८८ पदांसाठी मेगाभरती

Mumbai Municipal Corporation

मुंबई : मुंबई महापालिकेत आजपासून रिक्त पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यामध्ये चतुर्थश्रेणी कामगारांच्या एकूण १३८८ जागा भरल्या जाणार आहेत. २००९ नंतर यंदा सर्वात मोठ्या भरती करण्यात येत आहे.

जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण यांसारख्या विभागांमध्ये ही भरती होणार आहे. यामध्ये कामगार, हमाल, आया, स्मशान कामगार प्रवर्ग ही पदे रिक्त आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून राज्य सरकार आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाईन लिमिटेड कंपनीतर्फे या भरतीचे नियोजन होणार आहे.

अर्ज भरण्यासाठी अर्जदारांना महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. तसेच ३१ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या पदांसाठी घेण्यात येणारी परिक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.