औरंगाबाद आरोग्य विभागाचा मेगा प्लॅन : ५० डॉक्टर्ससह ५२७ पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय

doctor

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशातच जर हा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला तर याचे गंभीर परिणाम संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशालाही सहन कारावे लागणार आहेत. अशातच काल एक धक्कादायक बातमी समोर आली. राज्यातील आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल २,५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय विशेषज्ञांची तब्बल ४९३ पदे रिक्त आहेत.

या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आरोग्य विभागाने ५० डॉक्टर्ससह ५२७ पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेगाभरतीसाठी निवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण केलं आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी होणार आहे. या सर्व निवृत्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पध्दतीने केली जात आहे. कोरोना व्हायरस साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादमध्ये मोठी मोहिम सुरु केली जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत संशयितांच्या तातडीने चाचणी आणि विलगीकरण यावर भर दिला जाणार आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर आता नागपूर आणि औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांमध्येही कोरोनाचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद आरोग्य विभागाने हा मोठा निर्णय घेतला. लवकरच औरंगाबादेत घेण्यात येणार आहे. यातून आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.