१२ नोव्हेंबर रोजी पश्‍चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

Meghablock

मुंबई : ओव्हरहेड वायर, लोहमार्ग आणि सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्‍चिम रेल्वे रविवारी १२ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत दोन्ही दिशांच्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर सोडण्यात येणार आहे.