दौंड-सोलापूर दरम्यान १ नोव्हेंबरपासून ब्लॉक; गाड्यांमध्ये बदल

पुणे : दौंड-कुर्डुवाडी-सोलापूर सिंगल लाईन विभागात वाशिंबे आणि जेऊर दरम्यान ट्रॅकच्या कामासाठी एक नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी रोज एक तास ४५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यावरून तसेच पुणे स्थानकातून सोलापूरला जाणा-या गाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहे.

गाडी क्रमांक ११००१/११००२ साईनगर – पंढरपूर – साईनगर ही गाडी आठवड्यातून तीन दिवस रद्दबातल आहे. तर १२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे इंटर सिटी ही गाडी रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक ५१४४९ पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडी आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत पुणे ते भिगवन रेल्वे स्टेशन पर्यंत धावणार

गाडी क्रमांक ५१४५६ सोलापूर-पुणे पॅसेंजर गाडी भिगवन ते सोलापूर स्टेशन दरम्यान धावणार नाही व गाडी क्रमांक ५१४५६ सोलापूर ते भिगवन रेल्वे स्टेशन दरम्यान धावणार नाही

गाडी क्रमांक १७०१४ हैदराबाद – पुणे एक्सप्रेस गाडी आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत न धावता हैदराबाद ते कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत धावणार

गाडी क्रमांक १७०१४ हैदराबाद-पुणे एक्सप्रेस गाडी आपल्या प्रस्तावित स्थानकापासून न धावता कुर्डुवाडी ते हैदराबाद रेल्वेस्टेशन पर्यंत धावणार नाही

गाडी क्रमांक १७०१३ पुणे ते हैदराबाद एक्सप्रेस गाडी पुणे ते कुर्डुवाडी स्टेशन दरम्यान धावणार नाही.

गाडी क्रमांक ११४०६ अमरावती-पुणे आठवड्यातून दोन वेळा धावणारी गाडी एक नोव्हेंबरपासून १२५ दिवसांकरीता एक तास उशिराने धावेल.प्रवाशांनी बदलांची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

You might also like
Comments
Loading...