रविवारी मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई  : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ पासून ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. तर कल्याणहून सकाळी १०.३७ पासून दुपारी ३.५६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर निघणा-या सर्व उपनगरीय सेवा दिवा आणि परळ स्थाळनकादरम्यादन धिम्या मार्गावरुन सोडण्यात येणार आहेत. या गाड्या परळ स्थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील.

छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०५ पासून दुपारी ३.२२ वाजेपर्यत प्रस्थान करणा-या डाऊन मार्गावरील जलद गाड्या आपल्या निर्धारित थांब्या ३ व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबतील. या गाड्या आपल्यात निर्धारित वेळेपेक्षा २० मिनटे उशि‍रा शेवटच्या स्थानकांवर पोहचतील. तर छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.०० पासून सायंकाळी ०६.०० वाजेपर्यत आगमन/प्रस्थाषन करणा-या डाऊन तसेच अप मार्गावरील धिम्या व गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनटे उशीरा पोहचतील.

ब्लॉक काळात दादर/छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणा-या सर्व मेल/एक्सकप्रेस गाड्या मुलुंड व माटुंगा स्थानकादरम्यान अप स्लो मार्गावरुन धावतील व आपल्या गंतव्य स्थानकांवर २० मिनटे उशीरा पोहचतील. ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंत सोडण्यात येणार असून ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातून सुटेल.

५०१०३ गाडीच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्यात येईल जी दादरहून ३.४० वाजता सुटेल आणि ठाणे स्थानकांवर ०४.०६ वाजता पोहचेल आणि ०४.१३ वाजता दिवा स्थानकावर पोहचेल. कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सांयकाळी ४.१० वाजेपर्यंत छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ वाजेपर्यत पनवेल / बेलापूर /वाशी येथे जाणा-या तसेच पनवेल / बेलापुर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यत छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस च्याल दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.

ब्लॉक काळात छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस या कुर्ला- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी-पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक काळात सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सआ हार्बर/मुख्य मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.