कोरियन शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई  : एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले साऊथ कोरियाचे उपअर्थमंत्री ह्युंग क्वान को यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई-नागपूर एक्सप्रेस वेचे काम अत्यंत गतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कोरियन शिष्टमंडळाला दिले.

बैठकीला मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यूपीएस मदान, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार उपस्थित होते. शिष्टमंडळात साऊथ कोरियाचे मुंबईतील कौन्सल जनरल सौंजेन कीम, विकास वित्त केंद्राचे महासंचालक तैसिक युन, एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेचे संचालक नॅमसंग किम, सेंगयंग छोई यांचा समावेश होता. बैठकीत मुंबई-नागपूर एक्सप्रेस वेबाबत चर्चा झाली. कोरियन कंपनी या मार्गाचे काम करणार आहे.

Loading...

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे हा आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा जगातील एकमेव व्हावा. कोरियन कंपनीचे काम व तंत्रज्ञान उत्तम आहे, पण कामात गती हवी. जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, काम त्वरित होण्यासाठी कोरियन तज्ज्ञांनी पाहणी करावी. महामार्ग आणि रस्ते सुरक्षा याबद्दलच्या तंत्रज्ञानावरही अधिक भर द्यावा. रस्त्यामधील स्मार्ट घटक आणि स्मार्ट तंत्रज्ञानालाही प्राधान्य द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा गांधी आमचे राष्ट्रीय आदर्श तर आहेतच, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत खूप मोठे योगदान दिले. जगात शांतता, अहिंसा प्रस्थापित करण्यास त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

शेती आणि शेतकरी हे बँकांच्या प्राधान्यक्रमाचे विषय व्हावेत – देवेंद्र फडणवीस

ह्युंग क्वान को म्हणाले, मी भारतात पहिल्यांदाच आलो असून महात्मा गांधी यांच्याबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पात तंत्रज्ञानाची मदत व आर्थिक सहयोग द्यायचा आहे.

१० बिलियन डॉलर एक्सप्रेस वे विकास संस्थेसाठी आणि ९ बिलियन डॉलर एक्स्पोर्टवर खर्च करण्याची तयारी त्यांनी यावेळी दाखविली.

स्मार्ट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे चे काम त्वरित व गतीने करण्याची ग्वाही कोरियन शिष्टमंडळाने यावेळी दिली.

महाराष्ट्रातील नव्या प्रगतीपर्वाचा लाभ घेण्यासाठी जगभरातील गुंतवणुकदारांनी राज्यात यावे – मुख्यमंत्री

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार