वृक्ष लागवडीसोबतच संवर्धनावर भर देण्याचे सहकारमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : वन विभागामार्फत राज्यात येत्या १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहकार विभागामार्फत १२ लाख ५० हजार वृक्ष लागवड करण्यात येईल. वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संवर्धनावर भर देण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधितांना दिले.

वृक्ष लागवडीच्या निमित्ताने निसर्गाचा होणारा ऱ्हास टाळता येईल. ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून श्री.देशमुख म्हणाले की, तालुकास्तरीय उपनिबंधक कार्यालयापासून तर विभागीय व राज्य कार्यालयांच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे.

यावेळी श्री.देशमुख यांनी जिल्हानिहाय वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेतला. वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

गेल्या वर्षी सहकार खात्याने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन ९४.८३ टक्के एवढे उद्दिष्ट साध्य केले होते.

You might also like
Comments
Loading...