विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त सभा,  मिरवणुकीला परवानगी नाही

bamu

औरंगाबाद :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कुठल्याही सभा, मिरवणूक, पदयात्रा, रॅली, विजय मार्च किंवा इतर कार्यक्रमाला पोलिस आयुक्तांनी परवानगी दिलेली नाही. मात्र, अभिवादन करण्यास कुठलीही बंदी नाही. आंबेडकर अनुयायांनी विद्यापीठ परिसरात गर्दी न करता घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक बनकर, पोलिस निरीक्षक प्रमोद कठाने, नायब तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह विविध संघटना, राजकीय पक्षांचे ५० ते ६० पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरातील उत्सवाप्रमाणेच नामविस्तार दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यापीठ परिसरात एकूण ५ ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्यापैकी एका ठिकाणी पोलिस नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून गर्दी नियंत्रणासाठी पथक कार्यरत असेल. शिवाय, छावणी, बेगमपुरा पोलिस ठाण्यांना त्या अनुषंगाने विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या