वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देण्याची मुस्लिम समाजाची तयारी,श्रीश्री रविंशकर यांच्यासोबत बैठक

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात उद्यापासून (९ फेब्रुवारी) सुरू झाली. या प्रकरणावरील सुनावणी आणखी टाळता येणार नाही असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गेल्या सुनावणीला स्पष्ट केले होते. त्यानंतर अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद या प्रकरणावर चर्चा सूर आहे. या संदर्भात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविंशकर यांनी मुस्लिम समाजातील १६ प्रतिनिधींशी काल चर्चा केली. ज्यात वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देण्याची तयारी मुस्लिम समाजातील नेत्यांनी दाखवली आहे, असा दावा आर्ट ऑफ लिव्हिंगनं केला आहे.

या बैठकीत वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देण्याची तयारी मुस्लिम समाजातील नेत्यांनी दाखवली आहे, असा दावा आर्ट ऑफ लिव्हिंगनं केला आहे. बंगलोरच्या आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमात झालेल्या बैठकीसाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मौलाना सईद सलमान हुसैन नादवी, उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झफर अहमद फारुकी तसंच लखनौच्या तिलेवाली मस्जिदचे प्रमुख मौलाना वसिफ हसन, माजी सनदी अधिकारी डॉ.अनिस अन्सारी उपस्थित होते.

shri shri ravishankar