राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पवारांच्या भेटीला ; दोघांमध्ये तीन तास झाली चर्चा

sharad pawar vs prashant kishor

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. पण अनेकांना माहिती नसेल की यामागे एक आणखी एका मोठ्या व्यक्तीचा हात आहे. राजकारणातले चाणक्य म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार म्हणून काम केले.

दरम्यान आज प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जावून जाऊन भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास भेट झाली. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकाचा चेहरा म्हणून कोण असणार यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत.

यूपीएच्या नवीन नेतृत्वाचाही सध्या शोध सुरु आहे. यामध्ये शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाणार का? अशाही चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे. परंतु बंगालच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रशांत यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP