मराठा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ‘वर्षा’वर बैठक, महाजन आझाद मैदानावर घेणार विद्यार्थ्यांची भेट

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली आहे. गिरीश महाजन आझाद मैदानावर विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे.

Loading...

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते.

याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलंय. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर हालचालींना वेग आला असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आझाद मैदानावर विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. इतकेच नव्हे तर, आचारसंहिता शिथिल करुन सरकारला प्रवेशाबाबत निर्णय घेण्याची मुभा देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. यासाठी आजच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची भेट घेणार असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले होत.

त्यानुसारच अजित पवार यांनी मराठा विद्यार्थ्यांसह वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. दरम्यान, मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांचं करिअर वाया जाऊ नये, यासाठी ठोस निर्णय घेण्याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली असल्याची माहित अजित पवार यांनी दिली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अस देखील अजित पवार म्हणाले आहेत.Loading…


Loading…

Loading...