टीम महाराष्ट्र देशा- ॲट्रॉसिटी कायदा गैरवापरास विरोध दर्शविण्यासाठी अहमदनगर मध्ये एका खुल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ॲट्रॉसिटी कायदा गैरवापर पीडित सर्वांनी सहभागी सर्वांनी या बैठकीला यावे असं आवाहन शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी केलं आहे. या मोहिमेच्या समर्थनार्थ #StopMisuseOfAtrocity हा हॅशटॅग वापण्यात येत आहे.
ॲट्रॉसिटी कायदा गैरवापरास विरोध दर्शविण्यासाठी सर्वांनी खालील हॅशटॅग वर सहभागी व्हा..#StopMisuseOfAtrocity
दि.28/4/2018,सायं.6 ते 9 वा. pic.twitter.com/4aawo5Gp20— Sagar kalokhe (@Sagar67406200) April 28, 2018
२९ एप्रिल रोजी होणाऱ्या या बैठकीत मराठा क्रांती मोर्च्याचे निमंत्रक, ॲट्रॉसिटी कायदा गैरवापर पीडित , यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठीकीत आगामी लढ्याची रूपरेषा ठरवण्यात येणार असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कॉंग्रेस-भाजपने घेतलेल्या भूमिकांवर देखील चर्चा होणार आहे.
ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापरामुळे त्रास झालेल्या सर्वधर्मियांचे एकत्रित आंदोलन उभारण्यात येणार आहे. या साठी तालुकानिहाय बैठका सुरू असून लवकरच ठिकठिकाणी समित्या स्थापन करून व्यापक आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी दिली.