के.के.रेंज संदर्भात शरद पवार व राजनाथ सिंह यांची गुरुवारी दिल्लीमध्ये बैठक!

pawar v/s rajnath singh

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, पारनेर या तालुक्यात के.के.रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. यात बागायती जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याविरोधात सर्व गावकरी एकवटले आहेत.

पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील तेवीस गावे हे के.के.रेंज अधिग्रहण कक्षात येत असल्याने सदर गावांतील नागरिकांचे जनजिवन अस्थिर झाले आहे. त्यासंदर्भात पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे बाधित २३ गावांचे प्रतिनिधीत्व करत के.के.रेंजच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत. यासंदर्भात आ.लंके हे खा.शरद पवार यांना घेऊन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी भेट घेणार आहेत.

खा.शरद पवार व खा.सुप्रियाताई सुळे यांची मंगळवारी दिल्ली येथे भेट घेऊन आ.लंके व सहकाऱ्यांनी के.के.रेंज संदर्भात सविस्तर चर्चा केली. शरद पवार साहेब यांनी ह्या प्रश्नाबाबत आग्रहाची भूमिका घेतली आहे असे आ.लंके यांनी सांगितले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटून सदर परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देऊ असे आ.लंके यांनी सांगितले. यावेळी वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राहुरीचे सभापती अण्णा सोडणर आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-