मराठा उद्योजक लॉबीची बैठक उत्साहात संपन्न

टीम महाराष्ट्र देशा- मराठा उद्योजक लॉबी ची मुंबई मधील पहिली व्यवसायिक सर्वसाधारण मिटिंग कामोठे येथील रॉयल दरबार येथे अगदी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमोद पाटील यांचं हस्ते शिवरायांच्या मूर्तीस हार अपर्ण करुन करण्यात आली.

स्वप्नील पाटील यांनी मराठा उद्योजक लॉबीची संकल्पना व वेळेचे महत्व समजावून सांगून व्यवसायचे नियोजनातून यश संपादनकरण्याचे महत्व सांगितले,तर देवराम हाडवळे यांनी शेंद्रिय उत्पादन व त्यावर वाढत असलेला ग्राहक वर्ग याचे व प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करून आत्मियता व व्यवसायिक भावना निर्माण व्हावी यावर भर देण्याची कल्पना सुचवली,
तर उदय थोरात यांनी आपल्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी पध्दतीने शेतकऱ्याच्या मालाला भाव देऊन त्यांच्या आदी अडचणींवर मात करण्यास आपन हातभार लावू, यासाठी इतरांशी चर्चा करून त्यावर कायम स्वरूपी उपाय आमलात आणता येईल व इतरांच्या प्रश्नावर सहकार्य कसे होईल त्यावर चर्चा केली.

यावेळी  प्रमोद पाटील यांनी ब्रॅण्डिंग व मालाचा दर्जा व मार्केटिंग शब्द शैली याचे मार्गदर्शन केले. डॉ.शिवाजी बेलोटे यांनी हायजेनिक व कडक नाथ चिकन महत्व पटवून देत त्यांनी स्वतःचा बेलोटे चिकन ब्रँड तयार करत स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.वैभव फरतडे यांनी चांगले मार्गदर्शन करून कार्यक्रमात सूत्रसंचालन करत सर्वांचे आभार मानले .

कार्यक्रमाची सर्व जबाबदारी कृषिराज चव्हाण, कल्पेश शेलार ,सचिन पाटील, डॉ.शिवाजी बेलोटे, देवराम हाडवळे, प्रमोद पाटील, वैभव फरतडे यांनी चांगल्या पद्धतीने करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. स्वप्नील पाटील यांनी मराठा उद्योजक लॉबी कशाप्रकारे काम करते व्यवसाय करताना काय करायला पाहिजे या याबाबत मार्गदर्शन केले