शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू ; सत्तेत राहण्यावर चर्चा?

uddhav thackeray-sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असल्याच समोर आल आहे. भाजप विरोधातील नाराजी यावेळी उद्धव यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली आहे.

मागील काही काळापासून शिवसेना आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आल्याच दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या हालचाली भाजपकडून केल्या जात आहेत. राणे यांच्या प्रवेशाला शिवसेनेचा विरोध असतानाही भाजप सेनेला विचारात घेत नसल्याचं दिसत आहे. याच दरम्यान आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.