औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर जलसंपदा विभागात बैठक, सिल्लोड-सोयगाव मतदार संघाचे प्रश्न मार्गी

abdul sattar

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. भराडी प्रकल्प रद्द करुन पाच बॅरेजेसच्या सर्वेक्षणाचे काम २० सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.

भराडी प्रकल्पात उपलब्ध असणारे ६.७९५ दलघमी पाणी पूर्णा नदीत वळवून, त्यात ठराविक अंतरावर पाच ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. तर सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असून सिंचन क्षेत्रातही मोठी वाढ होणार असल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले. त्यावर जलसंपदा मंत्री पाटील यांनी २० सप्टेंबर पर्यंत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

सिल्लोड सोयगाव मतदार संघातील नाणेगाव, जंजाळा आणि अंबई या ठिकाणी बंधारे बांधण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या बंधाऱ्यांमुळे शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. तसेच अजिंठा जवळ निजामकालीन बंधारा आहे या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली तर त्या भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे राज्यमंत्री सत्तार यांनी मांडल्यानंतर पुरातत्त्व विभागाची परवानगी घेऊन काम मार्गी लावण्याचे आदेश जलसंपदामंत्री पाटील यांनी दिले. तसेच खेळणा प्रकल्पाची उंची वाढवण्यास तत्त्वतः मान्यता यावेळी दिली.

सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. या संपादित केलेल्या जमिनीचे लवकरात लवकर मोजमाप झाले नाही. तर त्या ठिकाणी अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी शंका राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी उपस्थित केली. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तत्काळ मोजमाप करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP