रेल्वेच्या प्रलंबित कामाबाबत मराठवाड्यातील खासदारांची बैठक घ्या– खासदार इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel

नवी दिल्ली : औरंगाबाद तसेच मराठवाड्याचे रेल्वे संदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या संदर्भात मराठवाड्यातील सर्व खासदारांची बैठक घेण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या बैठकीमुळे मराठवाड्यातील प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यात आजतागायत प्रस्ताव, प्रकरणे, मागण्या व कामे केंद्र शासनस्तरावरच प्रलंबित असल्याची माहिती दिली. मराठवाड्यातील रेल्वेविभागाची विकासात्मक प्रलंबित असलेली मागण्या व कामे पुर्ण होण्याकामी शासनस्तरावर मराठवाड्यातील सर्व खासदार व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्तरित्या बैठक घेवुन कामे मार्गी लावण्याची मागणी केली. बैठक घेण्यात यावी याकरिता पत्र सुध्दा दिले.

मराठवाड्यातील सर्व खासदारांची ही बैठक झाली तर मराठवाड्यातील अनेक प्रश्न मार्गी लागण्यासाठी नक्कीच मदत होईल. सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात रावसाहेब दानवे यांना रेल्वे विभाग तर डॉ. भागवत कराड यांना अर्थ मंत्रालयात जबाबदारी मिळाली आहे. या दोन्ही मंत्र्यांचा फायदा मराठवाड्याला झाला तर मराठवड्याच्या विकासात नक्कीच भर पडेल.

महत्त्वाच्या बातम्या