मेरठ संमेलन :संघाचे जोरदार शक्तिप्रदर्शन ; ३ लाख स्वयंसेवकांची उपस्थिती

rss

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रोदय संमेलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. काल देशभरातून जवळपास तीन लाख स्वयंसेवक या संमेलनाला उपस्थित असल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे.असं असलं तरीही मेरठ मधील शिबीर म्हणजे शक्तिप्रदर्शन नसून, शक्तीचे प्रदर्शन करण्याची गरज नसते. ती असेल तर दिसून येतेच असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे शक्तिप्रदर्शना बाबतच्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे.

Loading...

राष्ट्रोदय संम्मेलनात अनेक भाजपचे अनेक नेते आणि मंत्री संघाच्या गणवेशात सहभागी झाले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना यावेळी मार्गदर्शन केले. काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कर आणि स्वयंसेवकांबद्दल केलेल्या वक्यव्यावरुन वाद निर्माण झाला होता. नव्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार करणे आणि अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

rss

मार्गदर्शनपर भाषणात काय म्हणाले सरसंघचालक
कट्टर हिंदुत्व याचा अर्थ कट्टर सत्य आणि अहिंसेचे पालन करणारा असा आहे. कट्टरता ही उदारतेसाठी असून, समाजाच्या विकासासाठी सर्व समुदायातील लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले पाहिजेत, देशाच्या ऐक्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असून केवळ भारत हाच जगाला दिशा दाखविण्याचे काम करू शकतो. देशाच्या एकतेसाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असून, यात व्यत्यय आणण्याचे प्रकार मागे घडले आहेत; यापुढेही घडतील. त्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. जग एखाद्या चांगल्या गोष्टींवर तेव्हाच विश्वास ठेवते; जेव्हा त्यामागे कोणती शक्ती असते.”

हा कार्यक्रम म्हणजे शक्तिप्रदर्शन नसून, शक्तीचे प्रदर्शन करण्याची गरज नसते. ती असेल तर दिसून येतेच. एक पूजा पद्धती आणि एक भाषा याने देशाचा विकास होणार नसून, येथील विविधतेला एकतेच्या सूत्रात बांधल्यानंतर देश पुढे वाटचाल करेल. आपण जातीपातीमध्ये विभागले गेलो असून, त्याचा फायदा इतर देशांना होत आहे. भाषा खान-पान निवास पंथ वेगवेगळे असू शकतात. मात्र आपण हिंदू आहोत आणि भारत हेच आपले घर आहे.” असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

Dr. Mohan Bhagwat ji speaking at Meerut. #Rahstroday2018

Dr. Mohan Bhagwat ji speaking at Meerut. #Rahstroday2018

Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 25, 2018

3 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...