कोणत्याही परिस्थितीत आव्हान स्वीकारा – मीरा बोरवणकर

Meeran Chadha Borwankar

सोलापूर – कोणतेही आव्हान समोर असू द्या, आत्मविश्वासाने सामोरे जा. युवतींनीही कणखरता दाखवत स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. मी तर म्हणते आव्हान समोर उभे ठाकले तर, होय मी हे करू शकतो, असे म्हणून ते स्वीकारा. कोणत्याही परिस्थितीत आव्हान स्वीकारलेच पाहिजे, स्वत:वर विश्वास ठेवायला शिका’, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा चढ्ढा-बोरवणकर यांनी येथे केले.

Loading...

दयानंद महाविद्यालयात ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर त्या बोलत होत्या. डॉ. बोरवणकर नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची मुलाखत ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी संगीता भतगुणकी यांनी घेतली.डॉ. बोरवणकर म्हणाल्या, तुम्हाला कोणते करिअर आवडते त्यातच रस घ्या. आयपीएस हे करिअर निवडताना अनेकांनी तुम्हाला हे जमणार नाही, असेच सांगितले होते. २५ खात्यांची नावे समोर असतात. जे आवडेल त्याच विभागात कार्य करा. आमच्या ८१ च्या बॅचमध्ये सात अधिकारी महाराष्ट्रात आले. त्यात एकही महाराष्ट्रीय नव्हता.

यानंतर महाराष्ट्रातून जागृती सुरू झाली आणि आता यूपीएसएसीत महाराष्ट्रही अग्रेसर आहे.लहापनणापासून अॅडव्हॅचर्स म्हणून मी घोडेस्वारी केली. विविध नैपुण्य मिळाले. पंजाब क्रिकेट संघात होते. मुलगी आहे म्हणून मागे का राहावे? माझी आई शिकलेली. पंजाबमध्ये आम्ही निर्वासित होतो. आम्ही पाकिस्तानमधून आलो. पण आईने खंबीरपणे आम्हाला उभे केले. वडिलांचे अॅम्बिशनही मार्गदर्शक ठरले.Loading…


Loading…

Loading...