कॉंग्रेस मुक्त भारताऐवजी गरीबी, जाती-पाती मुक्त भारताचा नारा हवा – मीरा कुमार

मीरा कुमार यांनी भाजपवर साधला निशाना

पुणे :आज काँग्रेस मुक्त भारत असा नारा काहीजण देत आहेत. परंतु काँग्रेसमुक्त भारतापेक्षा गरीबीमुक्त भारत, जाती-पातीमुक्त भारत, संप्रदाय मुक्त भारत असा नारा का दिला जात नाही असा सवाल उपस्थित करत लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी भाजपवर निशाना साधला. ‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम’ या डॉ. विकास आबनावे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

या  प्रकाशन सोहळ्याच्या  कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, डॉ.विकास आबनावे, अविजित अंशुल, डॉ. नफेसिंह खोबा, त्रिमोहन कुमार, मनोज कुमार, दिलीप आबनावे, राजेश आबनावे, शिरीष आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, प्रकाश आबनावे प्रसाद आबनावे आदी उपस्थित होते.

मीरा कुमार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

bagdure

आज मी मन की बात नाही, तर दिल की बात, आत्मा की बात करीत आहे. एकाच धर्माचे लोक भारतात राहणार असतील, तर बाकीच्या धर्माचे काय होणार, ते लोक कुठे जातील. वाद किंवा द्वेष निर्माण करणे हे धर्माचे काम नाही. तर चांगले विचार निर्माण करणे आणि माणसाच्या मनात देवत्व निर्माण करणे, हे धर्माचे काम आहे.

तब्बल २२ वर्षांनंतर मी पुण्यात आले आहे. इथले वातावरण अतिशय सुंदर आहे. आधुनिक भारताचे हे आधुनिक शहर आहे. उद्यम, परिश्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे हे शहर असून ही क्रांतीची भूमी देखील आहे. क्रांतीचे बीज येथे रोवण्यात आले होते. इथे खूप प्रेम मला मिळाले, परंतु मी पुण्यात यायला उशीर केला, असे सांगत त्यांनी पुण्याचे कौतुक केले.

आज काँग्रेस मुक्त भारत असा नारा काहीजण देत आहेत. परंतु काँग्रेसमुक्त भारतापेक्षा गरीबीमुक्त भारत, जाती-पातीमुक्त भारत, संप्रदाय मुक्त भारत असा नारा का दिला जात नाही असा थेट सवाल मीरा कुमार यांनी उपस्थित करत भाजपवर निशाना साधला

 

You might also like
Comments
Loading...