मेडिटेशन लिव्ह: तुमची कंपनी तुम्हाला मेडिटेशनसाठी वेगळ्या सुट्ट्या देते का ?

कैपिलरी टेक्नोलॉजी

सिंगापूर: आजच्या धावपळीच्या जगामध्ये मनसिक स्थैर्य प्राप्त करणे कठीण झाल आहे. तर दैनंदिन जिवांतील धावपळ, सोशल मिडिया, तणाव यापासून मुक्ती मिळेल असे एक साधन आहे ते म्हणजे मेडीटेशन मात्र यासाठी देखील नोकरदारांना वेळ मिळणे शक्य नसते मात्र एका कंपनीने हि चिंता मिटवली आहे.

मुळचे भारतीय असलेल्या ‘अनिश रेड्डी’ यांची ‘कैपिलरी टेक्नोलॉजीज’ ही सिंगापुर ची सॉफ्टवेयर सर्विस स्टार्टअप कंपनी आहे. त्यांनी डिसेंबर २०२० पासून आपल्या कर्मचाऱ्यांना ११ दिवस ‘मेडीटेशन लिव्ह’ म्हणजे विपश्यनासाठी सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. रेडी आणि स्वतः फेब्रुवारी 2020 मध्ये पहिल्यांदा विपश्यना कोर्स केला त्यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ यांना देखील हा कोर्स करण्यासाठी पाठवले त्यानंतर आता सर्व कर्मचाऱ्यांना विपश्यनेचा अनुभव यासाठी ११ दिवसांची वेगळी सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे.

नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसाठी भारतातील पांडेचेरी च्या एअरोविले येथे आल्यानंतर त्यांनी आपला देश पशने संदर्भातील लिंकडइन् वर शेअर केला आहे. यावेळी ते म्हटले, ‘ एकदम जादू प्रमाणे काम केल आहे. त्याने मला वैयक्तिक आणि उद्योगातील तणावापासून मुक्त केल आहे. तर मनाला शांती मिळाली असून एक ऊर्जा प्राप्त झाले आहे.’ त्यांनी सांगितलं

विपश्यना- विपश्यना म्हणजे जगाला जसं आहे तसं बघणे, कोणत्याही पूर्वानुभवाला कोणत्याही गोष्टीशी न जोडता बघणे. याला साधनेला बौद्ध आणि जैन धर्म यांमध्ये विशेष करून महत्त्व आहे. तर तणावमुक्त जगण्यासाठी विपश्यना एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो.

महत्वाच्या बातम्या