समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये मेडिटेशन शिबिर

लहान मुलांना दिले ध्यानसाधनेचे धडे

यवतमाळ / संदेश कान्हु : आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तिना नकारात्मक विचारांनी जखडले आहे . विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाचा ताण खुप वाढत आहे. एकाग्रता वाढविण्यासाठी विद्यार्थिवर्गाने ध्यानसाधना करणे गरजेचे आहे .हेच ध्यानाचे महत्व जाणून शिक्षणात चिमुकल्या विद्यार्थ्यांना मेडिटेशन काय आहे याची जाणीव करुण देण्यासाठी पुसद येथील समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये मेडिटेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पुसदच्या समर्थ इंग्रजी माध्यम विद्यालय येथे समर्पण ध्यान समितीचे आशीष कालावार यांनी मुलांना सर्वांगीण विकास आणि एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान शिबिर घेतले. आजच्या पिढीला ध्यानाची गरज आणि आवश्यकता का आहे हे मुलांना कालावार यांनी समजून सांगितले तसेच ध्यानाचे महत्व पाठवून दिले. या शिबिराला 1 ते 4 वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते . यावेळी मुख्याध्यापक अनघा चक्रवार शाळेतील शिक्षिका व अध्यक्ष विजय चक्रवार उपस्थित होते .