आ मेधा कुलकर्णी यांनी अस वक्तव्य करायला नको होतं – खा संजय काकडे

आ कुलकर्णी तशा बोलल्या असतील तर मी माफी मागतो - संजय काकडे

टीम महाराष्ट्र देशा : आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधीच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणल्याचे पडसाद आजही पहायला मिळत आहेत. आ कुलकर्णी यांनी अशाप्रकारे वक्तव्य करायला नको होते, अशी भूमिका खा संजय काकडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या वतीने आपण समाजाची माफी मागत असल्याचेही ते म्हणाले.

मराठा क्रांती मोर्चाकडून आज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वतः काकडे यांनी आंदोलनात सहभाग घेत मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे. समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याचं काकडे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाबद्दल केलेल्या व्यक्तव्याबदल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलक महिलांनी केली. तसेच याबद्दलचे निवेदन त्यांनी संजय काकडे यांना दिले आहे.

पुण्यात रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असणारे मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

You might also like
Comments
Loading...