मेकॉलेप्रमाणे ‘बारामतीकर’ भारतीय समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करत आहेत : कुलकर्णी

blank

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात मेकॉलेने भारतीय समाजात ज्या पध्दतीने फूट पाडली. तसा प्रयत्न बारामतीकर करत आहेत. स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी बारामतीकर ‘मेकॉले’ याला वाटेला लाव, त्याला वाटेला लाव असे करून आज समाजात दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र,त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशा शब्दात कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ब्रह्मोद्योग-२०१८ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, अभिनेत्री मृणाल देव, आमदार शोभा फडणवीस, आमदार मनीषा कायंदे, महिला आघाडीच्या मोहिनी पत्की यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘मातृशक्तीचा जागर’ मेळाव्यात उद्योजिका जयंती कठाळे, मोहिनीताई मोडक, आरजे शोनाली रानडे, सविता वासेकर, मंजुश्री कुलकर्णी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

नेमकं काय म्हणाल्या आमदार कुलकर्णी ?

संत ज्ञानेश्वरांनी दुस-यासाठी पसायदान मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशासाठी आपले आयुष्य झिजवले. अशाप्रकारे ब्राम्हण समाज पूवीर्पसून दुस-यांसाठी झटत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मेकॉलेने भारतीय समाजात ज्या पध्दतीने फूट पाडली. तसा प्रयत्न बारामतीकर करत आहेत. स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी बारामतीकर ‘मेकॉले’ याला वाटेला लाव, त्याला वाटेला लाव असे करून आज समाजात दुजाभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र,त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही.