माळशेंद्रा येथे कोरोनाबाबत उपाययोजना, ग्रामस्थांमधून समाधान

जालना । जागतिक आरोग्य दिन तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील माळशेंद्रा येथे ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात ट्रॅक्टरद्वारे सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले. तसेच गावातील प्रत्येक ग्रामस्थांना मास्कचे वाटप करून सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे तसेच वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन देखील केले.

कोरोना काळात प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, गावात कोरोना संसर्ग पसरू नये, याकरिता गाव पातळीवरही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध उपाय योजना राबवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून जागतीक आरोग्य दिनानिमित्त बुधवारी माळशेंद्रा ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण व्हावेयाकरिता सॅनिटायझर फवारणी तसेच मास्क वाटपाचा उपक्रम राबवला. प्रारंभी उपसरपंच बालासाहेब जाधव यांच्या हस्ते सॅनिटायझर फवारणीचे उद्घाटन करण्यात आले.

सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन मास्कचे वाटप केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेकडर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गावातील सर्व मुख्य रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून सॅनिटायझर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात प्रथमच राबवलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळून हा उपक्रम राबवण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या :