fbpx

MCD Election- दिल्लीत पुन्हा भाजप ; आप, कॉंग्रेसचा धुव्वा

२७० पैकी १८० जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवलं आहे.
दक्षिण दिल्ली महापालिका (104) : भाजप : 70 I काँग्रेस : 11 I आप : 17 I इतर : 6
उत्तर दिल्ली महापालिका  (103) : भाजप : 66 I काँग्रेस : 13 I आप : 21 I इतर : 3
पूर्व दिल्ली महापालिका (63) : भाजप : 49 I काँग्रेस : 3 I आप : 9 I इतर : 2
? दिल्लीतील दारुण पराभवानंतर आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केले असून दिल्लीतील ही मोदी लाट नाही, तर ईव्हीएम लाट आहे, असा आरोप केला आहे.
? दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिलाअसून काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
? दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन वर्षांच्या पारदर्शक कामकाजावर शिक्कामोर्तब केले आहे. दिल्लीच्या निकालानंतर भाजपाचा विजयरथ आता प्रगतिपथावरच राहील. आता कोणाचेही नकारात्मक राजकारण चालणार नाही. दिल्लीचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेसाठी राबवलेल्या गरीब-कल्याण योजना आणि सबका साथ सबका विकास या नीतीचा विजय आहे. – अमित शाहा, भाजपा अध्यक्ष
[jwplayer 6aYNTKxB]