Share

Ambadas Danve | “सकाळी अर्ज केला अन् संध्याकाळी माहिती समोर, एवढा सुपरफास्ट कायदा?” अंबादास दानवेंनी समोर आलेली माहिती फेटाळली

Ambadas Danve | मुंबई : राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याने महाराष्ट्रातील जनता तसेच राजकारण तापू लागलं आहे. एवढंच नाही तर विरोधकांनी जोरदार आरोप देखील केले आहेत. यावर MIDC कडून देण्यात आलेल्या महाविकास आघाडी वर आरोप करण्यात आले. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वेदांता प्रकल्पाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच सकाळी अर्ज केला आणि संध्याकाळी माहिती समोर येते, एवढा सुपरफास्ट माहिती अधिकार कायदा कधीपासून झाला?, असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे यातील माहिती बनावट असल्याचं दानवेंनी दानवेंनी म्हटलंय.

MIDC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वेदांता प्रकल्प राज्यात राहावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत. तसेच शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर वेदांता प्रकल्पासाठी बैठक झाली असून महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळे, उदासिनतेमुळेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं म्हटलं जात आहे.

15 डिसेंबर 2021 ला हा प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आला, त्यानंतर 5 जानेवारी 2022 ला वेदांताने या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्रासमोर ठेवला असून 11 जानेवारीला महाराष्ट्राने प्रिंसिपल अॅप्रुव्हल दिला, अशी माहिती दानवेंनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ambadas Danve | मुंबई : राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याने महाराष्ट्रातील जनता तसेच राजकारण तापू लागलं आहे. एवढंच नाही तर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now