इंजिनियर ते महाराष्ट्राचा लाडका ‘मिमस्टर’

mayur shivalkar standup comidian

हल्ली सोशल मिडीयावर आपल्याला वेगवेगळे मिम्स पहायला मिळतात. खळखळून हसताना एक प्रश्न नेहमी आपल्याला पडतो की,कोण बनवत हे मिम्स आणि कुठून सुचत हे सगळं? तर मित्रानो आज आपण मयुर मिलींद शिवलकर या मिमस्टर बद्दल जाणून घेणार आहोत. विशीतल्या या तरुणाच्या मिम्सने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. SEMI ENGLISH MEDIUM , MARATHI PUNS , इतकच नाही तर Zomical यादिल्ली मधील पेजवर प्रसिद्ध होणारे मिम्स मयूर तयार करतो. मुंबई येथील पवई मध्ये राहणारा , १० ते ५.३० नोकरी करणारा हा तरुण stand-up comedian देखील आहे . आणि इतर काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या आजच्या तरुणाईसाठी एक आर्दश उदाहरण .

Loading...

प्रश्न : तुझ्याविषयी वाचकांना काय सांगशील ? तु कॉमेडियन किंवा memester व्हाव अस तुला का वाटलं ?
मयूर : मी College Of Engineering Pune मधून graduation केल. “टिपिकल घर वालो ने बोला और मैने engineering कर ली” . साचेबद्ध नोकरी शोधली आणि मिळाली . ह्याशिवाय वेगळा काहीतरी करायचंय अस मलाही वाटायचं पण नेमकं काय हे उमगत नव्हत , साहजिकच gym वगैरे गोष्टी try केल्या पण फारशी मजा आली नाही.

नोकरी लागून २ महिने पण झाले नसताना माझी आई मृत्यू पावली . हया घटनेने  मला अगदीच निराश आणि एकाकी केलं. आईचा छत्राशिवाय मी काय आणि कस करु याचा तासनतास विचार करत मी पवई लेक वर बसायचो. एकदा मी साहिल शाह ह्यांचा every indian mom हा सेट बघितला मला तो फारच परस्परसंवादी वाटला . मी त्यांचा live show बघायला गेलो आणि ६ महिन्यांचा काळावधीनंतर खूप हसलो. तेव्हा मला वाटलं की कॉमेडी मला माझे विचार विसरायला लावून एक निराळी कला जोपासायला मदत करेल .

प्रश्न : तुझा ह्या क्षेत्रातील पहिल्या कामाचा अनुभव कसा होता ?
मयूर : माझा पहिला open mic मी २०१५ च्या मे महिन्यात केला . स्टेजवर काय बोललो हे माझं मला आठवत नाही पण मोठी हिम्मत करून गेलो होतो. त्यांनतर एकांनंतर एक अडखळत , आत्मविश्वास वाढवत अनोळखी लोकांना हसवत गेलो. दरवाज्यावरचा शिपायांनाकडून देखील प्रशंसा ऐकून खूप छान वाटला . “Thats what I was supposed to do . Make everyone smile . Make strangers laugh”.

प्रश्न : Memes च आजकाल खूप वेड आहे, तुझा meme making चा अनुभव कसा आहे ?
मयूर : मी memes सुद्धा बनवतो अस सांगितल्यावर लोक म्हणतात की साधारणतः comedians तेच करतात पण माझबाबतीत थोडा वेगळ आहे . मी social media वर memes चे पेजेस चालवतो त्याची प्रसिद्धी इतकी दिवसेंदिवस एवढी वाढली आहे की आता लोक मला memester( की काय ते) म्हणुन ओळखतात . माझे memes अतिशय पाचकळ किंवा कधी कधी निरर्थक असतात पण लोकांना ते खूप आवडतात , लोक खूप हसतात ,टीका करतात पण त्यापेक्षाही जास्त ते माझ्यावर प्रेम करतात .

प्रश्न : ह्या क्षेत्रात करिअर करताना तुला कोणत्या अडचणी होत्या ?
मयूर : अडचणीपेक्षा असे काही लोक होते ज्यांच्या मते मी comedy / memes बनवून काय भविष्य घडवणार आहे असा सवाल केला . आज तेच लोक माझा memes चा कंमेंट मध्ये मोठे मोठे convseration करतात ते माझे चाहते आहेत हे पाहून वेगळ्या प्रकारच समाधान मिळत . मी स्वतःचा मताचा आदर करून हे क्षेत्र निवडल्याचा आणि त्यातून मी पैसे कमावतो आहे ह्याचा अभिमान वाटतो.

प्रश्न : तुझे आदर्श कोण आहेत ? तुझा करिअर घडवण्यासाठी तुला मार्गदर्शन कुणी केलं?
मयूर : जॅकी ठक्कर आणि विग्नेश पांडे हे माझे आदर्श आहेत . काही अशी मित्रमंडळी ज्यांनी वेळोवेळी आहे त्या परिस्थितीमध्ये देखील जमेल ती मदत केली त्यांचे धन्यवाद मानेन .

प्रश्न : आतापर्यंत एवढं यश मिळाल्यावर मागे वळून बघताना काय वाटत?
मयूर : जेव्हा मला वाटत एक चांगली नोकरी असताना मी हे सगळं का करत आहे , तेव्हा माझामधला अस्वस्थ मयुर मला सांगतो की तुला अजून काहीतरी वेगळं करायच आहे स्वतःच उत्तम version बनायचं आहे .

Shows मुळे मला ठिकठिकाणी फिरायला मिळत , त्यामुळे एक व्यक्ती म्हणून मी खूप बदललो आहे . मी परफेक्ट नक्कीच नाही. दिवसाच्या शेवटी सुखाची झोप घेताना आईला आज काय केलं हे थोडक्यात सांगताना खूप बर वाटत .

मजकूर – मयुर मिलिंद शिवलकर

शब्दांकन – सायली सुनील रिसबूड

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने