शनिवार वाड्यावरील खासगी कार्यक्रम बंदी निर्णयाला महापौरांची स्थगिती

shaniwar-wada-from-main

पुणे: शनिवार वाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणाच कारण देत या पुढे खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र जोपर्यंत हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे येऊन निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत याला स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. तसेच या बद्दलच पत्र आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात येणार असल्याचही त्यांनी सांगितले.

शनिवार वाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुख्य बाजारपेठेतील शिवाजी रोड तसेच बाजीराव रस्त्यावर वाहतुकीचा ताण येतो. तसेच ऐतिहासिक वास्तू असल्याने त्याच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने यापूढे कोणत्याही खासगी कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान या निर्णयानंतर मोठी टीका सुरू झाली आहे. आजवर अनेक संघटनांना तसेच संस्थांच्या शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना परवानगी दिली गेली मात्र एल्गार परिषदेनंतरच महापालिकेला धोरण कसे लक्षात आल्याचा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...