पुण्यातील झोपडपट्ट्यांसाठी महापौरांनी एसआरए योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी-आ.चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यातील झोपडपट्ट्यांसाठी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी एसआरए योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या कोथरुड नागरी सत्कार सोहळ्यात पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीष बापट, माजी गृहराज्यमंत्री रामेश बागवे, माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेना नेते आणि माजी मंत्री शशिकांत सुतार, सिनेनाट्य अभिनेते विक्रम गोखले यांसह इतर अनेक पक्षांचे, विविध संस्थांचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Loading...

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्याचे शहरीकरण जसे वाढत आहे, तसे झोपडपट्ट्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघात जवळपास ८० हजार मतदार झोपडपट्टीत राहत आहेत. त्यामुळे यांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन पुण्याला झोपडपट्टी मुक्त शहर बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपला मतदारसंघ समस्या मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना करतात. त्यानुसार गेल्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही कोल्हापूरमध्ये अनेक उपक्रम राबविले. यामुळे शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावले. असेच काम आता पुण्यात देखील उभारले पाहिजे. त्यासाठी मुरलीधर अण्णांनी प्रयत्न करावेत.

दरम्यान, कोथरूडमध्ये सांस्कृतिक कला केंद्र उभारण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत असल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या कला केंद्रात प्रशिक्षण केंद्र देखील कार्यन्वित केले जाणार आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका