fbpx

तुकाराम मुंढे हे हिटलरशहा;नाशिकच्या महापौरांचा हल्लाबोल

Tukaram-mundhe pmpml

टीम महाराष्ट्र देशा : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

तुकाराम मुंढेना नकारात्मक प्रसिद्धीची आवड

तुकाराम मुंढे हे हिटलरशहा आहेत. लोकप्रतिनिधींचा अनादर करणे एव्हढाच त्यांचा अजेंडा आहे. परस्पर निर्णय घेणे, लोकप्रतिनिधींना न जुमानने अशी त्यांची कार्यशैली आहे, अशा शब्दात नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी हल्लाबोल केला. नाशिक मनपाचे आयुक्त आणि कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 12 वर्षांच्या कारकीर्दीत अकराव्यांदा बदली झाली आहे. ते आता मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपद सांभाळतील. नाशिकमधून बदली होताच तिथल्या लोकप्रतिनिधींनी तुकाराम मुंढेंवर तोफ डागण्यास सुरुवात केली.

मी तुकाराम मुंडे …..

दरम्यान,शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांची नाशिकच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. अवघ्या नऊ महिन्यांतच ही बदली झाल्यानं राजकीय वर्तुळासोबतच सामान्यांतही ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली.मुंढेंनी महापालिका आयुक्त कार्यालय सोडताच भाजप समर्थकांनी फटक्यांची आतषबाजी केली. महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या निवास्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही मुंढेंच्या बदलीवर समाधान व्यक्त केल आहे.

तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी दणका! गणवेशात नसल्याने अधिका-याला बैठकीतून बाहेर काढलं

मुंडेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घ्या ; मुख्यमंत्र्यांचे आदेश