कोल्हापूरचा महापौर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचाच, चंद्रकांत पाटलांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी

टीम महाराष्ट्र देशा – कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीकडे राज्याचे लक्ष लागले होते.  पण आता कोल्हापूर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेच पुन्हा बाजी मारली आहे. मतदानानंतर आता निकाल स्पष्ठ झाला आहे.  कोल्हापूर महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता नंदकुमार मोरे विजयी झाल्या. त्यांनी भाजपा ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा ४१ विरूध्द ३३ मतांनी केला पराभव केला.

महापौर पदासाठी सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधकांनी सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी चालवली होती. अखेरच्या क्षणापर्यंत शह काटशहचे राजकारण रंगले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी या निवडीत थेट लक्ष घातल्याने हा सामना लक्षवेधी बनला होता. मात्र निकालानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला गड राखण्यात यश मिळवले. पालकमंत्री भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या अपेक्षावर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे.

Loading...

 

कोल्हापुरात तब्बल दोन हजार जणांविरोधात गुन्हा दाखल

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'