राजकीय क्षेत्रात कुणाची विकेट जाईल हे सांगता येत नाही- महापौर नंदकुमार घोडेले

गरवारे स्टेडियमवर श्रेयासाठी नेत्यांचा रंगला खेळ

औरंगाबाद : शिवसेनेच्या कार्यकाळात मी पालकमंत्री असताना गरवारे स्टेडीयम अस्तित्वात आल्याचे खा.चंद्रकांत यांनी स्पष्ट केले तर आमदार अतुल सावे यांनी हे गरवारे स्टेडियम माझ्या मतदार संघात आहे असे म्हणत स्टेडीयमवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टीचे उद्घाटन करताना शिवसेनेच्या श्रेयवादाच्या फलंदाजीवर जोरदार गोलंदाजी करत स्टेडीयमच्या लोकार्पणाचा राजकीय सामना  रंगला.

महानगर पालिकेच्या वतीने 1 कोटी 30 लाख रुपये खर्चुन गरवारे स्टेडीयम येथे आतंराष्ट्रीय खेळपटटीचे उद्घाटन खा. चंद्रकांत खैरे, व पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मात्र शहरवासीयांना क्रिकेट सामन्याऐवजी राजकीय व्यासपीठावरील फटकेबाजी अनुभवायला मिळाली. आमदार अतुल सावे भाषण करताना म्हणाले की, पीचवर जिंकण्यापेक्षा खेळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजकारणातील सामना असो किंवा क्रीडांगणावरील असो तो यापुढे कधीही ट्वेंटी-ट्वेंटी नसून तो फिफ्टी-फिफ्टीच असेल असे आमदार सावेंनी महापौर नंदकुमार घोडेलेंना खा. खैरेंच्या उपस्थितीत चिमटा काढला. तर यावर महापौर घोडेले म्हणाले की, राजकीय क्षेत्रात कुणाची विकेट जाईल हे सांगता येत नाही, बरे झाले माझी विकेट पिच वरच गेली असे म्हणत महापौर घोडलेंनी आमदार अतुल सावे यांच्याकडे इशारा करत खासदार खैरे यांचा राजकीय वरदहस्त असल्याची आपली सावध भूमिका स्पष्ट केली.

You might also like
Comments
Loading...