पुणे: राज्यभरात आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्यभरात आता निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सध्याच्या या रुग्णवाढीस कारणीभूत ठरत असून राज्यात सध्या चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. मुंबईमध्ये (Mumbai) रुग्णांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली असून पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
पुणे मनपा (Pune) हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. सध्या पुण्यात असणाऱ्या १४ हजार ८९० सक्रीय रुग्णांपैकी केवळ ५.४८ टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल पुण्यामध्ये एका दिवशी २,४७१ रुग्ण सापडले होते. दैनंदिन रुग्णसंख्येत आज वाढ झालेली पहायला मिळाली आहे.
पुणे मनपा हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असली तरी १४ हजार ८९० सक्रीय रुग्णांपैकी केवळ ५.४८ टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 9, 2022
पुण्यात वाढणाऱ्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी वक्तव्य केलं आहे. महापौर यांनी ट्विट करत म्हणाले की, पुण्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच. असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही’; रश्मी ठाकरेंवरच्या ‘त्या’ व्यक्तव्याला चंद्रकांत पाटलांचे समर्थन
- रावसाहेब दानवे यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही- खा.फौजिया खान
- जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; जाणून घ्या सुधारित निर्बंध
- औरंगाबादेतील बसस्थानके ठरू शकतात ‘कोरोना स्प्रेडर’…
- विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करा; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<