बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचे राणीच्या बागेत स्थलांतर

टीम महाराष्ट्र देशा : महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अधिकृतरीत्या महापौर बंगल्याचा ताबा सोडला आहे. ते आता भायखळ्यातील राणीच्या बागेतील सरकारी बंगल्यात राहायला गेले आहेत. महापौर बंगल्यात काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि शिवसेनेचे काही नेते उपस्थित होते. महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी अधिकृतरीत्या शिवाजी पार्कमधले महापौर निवास सोडलं आहे. त्यामुळे तिथे लवकरच बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाणार आहे.

महाडेश्वर म्हणाले, महापौर बंगल्यात लवकरच बाळासाहेबांचं स्मारक होईल, मी राणीच्या बागेतील सरकारी निवासस्थानी राहायला जातोय. मी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिपूजन सोहळ्याआधीच महापौर निवास खाली केलं आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात (अंडरग्राऊड) होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलीही तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्त्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करून त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'