मध्य प्रदेशात मायावती कॉंग्रेससोबत, कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर

टीम महाराष्ट्र देशा – अखेर मध्य प्रदेश मधील अंतिम निकाल आला आहे. स्पष्ट बहुमत मात्र कोणत्याच पक्षाला मिळाले नाही. कॉंग्रेसला बहुमतासाठी फक्त दोनच जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे सत्तेपासून दोन जागा दूर असलेल्या कॉंग्रेसला बहुजन समाज पक्षाने (बसप) समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

अंतिम निकाल हाती आल्यानंतर काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, भाजपला 109 जागा जिंकता आल्या.  इतर पक्षांना एकूण सात जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये बसपच्या 2 आणि समाजवादी पक्षाची एक जागा आहे. तर चार अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला बहुमतासाठी फक्त दोन जागांची आवश्यकता होता. आता बसपने समर्थन दिल्याने काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी सरसावले आहे. बसपच्या अध्यक्षा मायावतींनीच काँग्रेसला समर्थन देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.