लोकसभेच्या निकालानंतर मायावती भाजपसोबत युती करणार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. या संपूर्ण निवडणुकीत विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळाला. परंतु जसजसे निवडणुकांचे निकाल जवळ येत आहेत तसतसे राजकीय समीकरणे बदलायला लागली आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील एका नेत्याने निकालानंतर बसपा आणि भाजप युती करतील असं विधान केल आहे.

बसपाचे माजी नेते नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आता मायावती यांची निकालानंतर भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नसिमुद्दीन सिद्दीकी हे मायावतींसोबत ३३ वर्षे होते परंतु मागच्या वर्षी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बसपा व भाजच्या युतीविषयी बोलताना नसिमुद्दीन म्हणाले, ‘मी मायावती यांना त्यांच्या स्वत:पेक्षा जास्त चांगले ओळखतो. राजकारणात काहीही अशक्य नाही. मायावती यांनी याआधीही भाजपशी हातमिळवणी केली आहे. २३ मे ला निकालानंतर त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव निर्माण करण्यात येईल की त्या स्वत: महागठबंधनला फाट्यावर मारून भाजपसोबत जातील.

दरम्यान, बसपा भाजपसोबत गेल्यास समाजवादी पार्टीला देखील काँग्रेससोबत युती करावी लागेल असं नसिमुद्दीन सिद्दीकी म्हणाले आहेत. त्यामुळे निकालानंतर कोणता पक्ष कुणाला पाठींबा देणार आणि कुणाचे सरकार केंद्रात स्थापन होणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.