दलितांवरील अत्याचारावर मला बोलू दिल जात नाही – मायावती

Mayawati resigns from Rajya Sabha

वेबटीम : बसपा प्रमुख मायावती यांनी राज्यसभेच्या खासदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यसभा सभापतींकडे सोपवला. सहानपुर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्याने मायावती यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले.

पुढील वर्षी एप्रिलमध्ये मायावती यांच्या राज्यसभा खासदकीचा कार्यकाळ संपणार होता. राज्यसभेच्या सभापतींना तीन पानाचे पत्र लिहून मायावतींनी राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर मायावती म्हणाल्या, मी ज्या समाजातून येते, त्यांचेच मुद्दे मला सभागृहात मांडता येत नाहीत, तर काय उपयोग? मात्र मायावतींचा राजीनामा मंजूर केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आह