आर्थिक निकषावर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी मायावती मैदानात

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकार उच्च वर्णिय जातीच्या गरीबांना संविधानात सुधारणा करून आरक्षण देण्यासाठी पाऊल उचणार असेल तर त्याचं समर्थन सर्व प्रथम बसप करेल’, बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती म्हणाल्या. तसेच मुस्लीम आणि अन्य धर्मीय अल्पसंख्याक समाजात गरीबांची संख्या मोठी आहे. तेव्हा त्यांच्यासाठी देखील आरक्षणाची व्यवस्था केली गेली पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.

बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी आता नवीन डाव टाकत. एससी/एसटी विधेयकातील सुधारणाचं स्वागत करताना त्यांनी आर्थिक निकषावर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याच्या मागणीचं समर्थन तर केलंच. त्याचबरोबर मुसलमानांना आरक्षण मिळावं अस वक्तव्य देखील त्यांनी केल.
लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक राज्यसभेत देखील मंजूर होईल अशी आशा मायावती यांनी व्यक्त केली. मात्र हे सारं होत असताना दलितांना मोठा त्रास सहन करावा लागला. दलितांनी हिंदुस्थान बंद यशस्वी करून दाखवल्यामुळेच हे सुधारणा विधेयक आल्याचं म्हणत त्यांनी हे श्रेय आपल्या पक्षाच्या नवी करून घेतल.

उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का? : राणे

दलितांवरील अत्याचारावर मला बोलू दिल जात नाही – मायावती