भीमा कोरेगाव हिंचारामागे भाजप आणि संघच- मायावती

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यात दिसत आहेत. राजकीय पटलावर सुद्धा या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहेत. आधी राहुल गांधी आणि आता उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या हिंसाचारासाठी जबाबदार धरलं आहे.

या घटनेमागे भाजप आणि आरएसएसचा हात आहे. कारण तिथं सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी उपाययोजनाच करण्यात आल्या नव्हत्या. ही घटना रोखता आली असती. सरकारनं तिथं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवायला हवी होती.’ असा निशाना मायावती यांनी भाजप आणि संघावर साधला आहे.