लोकसभेची सेमीफायनल- मध्य प्रदेशात मायावतीच किंगमेकर

टीम महाराष्ट्र देशा – मध्य प्रदेशचा अंतिम निकाल थोड्यात वेळात जाहीर होईल. सध्याच्या जाहीर झालेल्या आकड्यानुसार कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी बहुजन समाज पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

त्यामुळे सत्तेची चावी ही बसपाच्या म्हणजेच मायावतींच्या हातात राहू शकते. मायावती नक्की कोणाला पाठींबा देणार हे मात्र आताच सांगता येणार नाही. मायावती यांनी निवडून आलेल्या सदस्यांची बैठक बोलावली आहे. मायावती यांचा निर्णय लवकरच जाहीर होईल. पण मध्यप्रदेश बाबतचा निर्णय घेताना मायावती तो निर्णय उत्तर प्रदेशातील राजकारणाचा विचार करूनच पुढील निर्णय घेतील, अशी शक्यता आहे.

 

You might also like
Comments
Loading...